Tuesday, March 22, 2011

अधुरी प्रेम कहाणी

पावसाळी दिवसातील ती दुपार होती, साधारण २-३ वाजले असतील पण सूर्याचा कुठेच ठाव-ठिकाणा नव्हता. आकाश काळ्या ढगांनी भरले होते, पावसाची बारीक-बारीक रिपरिप चालूच होती., सगळी धरती हिरवी-गार झाली होती, नारळाची झाडे मुक्त होऊन वाहणाऱ्या वाऱ्या बरोबर डोलत होती. घरात बसूनही कंटाळाच आला होता, मग कपडे चढवले, पायात चप्पल अडकवली आणि सरळ बाहेर पडलो. रत्नागिरीत तशी मनोरंजनाची ठिकाणे फार नाहीत. मग जायला कुठली वाट नसली की मी सरळ समुद्र किनाऱ्याची वाट धरतो. समुद्राची रूप पण किती वेगवेगळी असतात, सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात अवखळ भासणारा हाच समुद्र, दुपारी मात्र अंतःकरणात फार मोठे गुपित साठवून वागणाऱ्या गंभीर माणसासारखा भासतो. ओहोटीला, रुसून बसलेल्या मुलासारखा आपल्यापासून दूर जाऊन बसतो, तर भरतीला शत्रू सैन्यावर धावून जाणाऱ्या, विजयश्रीसाठी आसुसलेल्या सैन्यासारखा.
पावसात भिजत, समुद्राच्या हळुवार लाटा पायावर घेत किनाऱ्यावरून फिरण्यात जे सुख आहे ते काय वर्णावे. पण आज मला कशातच आनंद वाटत नव्हता. त्या विशाल समुद्रासमोर माझे एकटेपण मला जास्तच बोचत होते. ज्या हातात कुणाचा हात नाही, त्या हाताचा उपयोग तरी काय? आपली कुणीतरी असावी, जवळची. मनातले सगळे विचार तिच्यासमोर मोकळे करून टाकावेत, आपण बोलत राहावे आणि तिने ऐकत राहावे, आणि तिने बोलत राहावे आणि आपण ऐकत राहावे. तिच्या डोळ्यात बघत..सारी दुनिया विसरून जावे असे आणि बरेचसे विचार मनात गर्दी करून होते. माझी तंद्री भग्न पावली ति कोणाच्या तरी आवाजानेच. कोणीतरी मला हाक मारत होते. मागे वळून पाहिले तर नेहा पळत येताना दिसली.
नेहा, माझ्या वर्गातली एक गोड चेहऱ्याची, गोड आवाजाची, मुलगी. .कोणालाही आवडावी अशीच. माझी आणि तिची फारशी ओळख नव्हती. काही दिवसांपूर्वीच तिचे वर्गातीलच विनीत या मुलाशी जमले. खरं तर या बातमीने सगळ्यांनाच तसा धक्का बसला. विनीत दिसायला नीट-निटका, श्रीमंतीचा वारसा लाभल्याने नवीन नवीन गाड्या, सिनेमे, पार्ट्या यामध्येच रमणारा, त्याचे मित्रही थोडेसे गुन्हेगारी प्रवृत्तीचे. कॉलेजमध्ये अधून-मधून घडणाऱ्या हाणामारीच्या प्रकरणात आघाडीची भूमिका बजावणारे. माझी आणि विनीतची तशी सुरुवातीला चांगली ओळख होती, पण नंतर नंतर मीच त्याच्यापासून जरा दूर झालो. नेहा अजूनही पळत येत होती. वाऱ्याने तिचे लांबसडक केस पार विस्कटून टाकले होते. कपाळावर टिकली, एका हातात नाजुकसे ब्रेसलेट आणि दुसऱ्यात दररोज वेगवेगळ्या असणाऱ्या बांगड्या, आणि पांढरा शुभ्र पंजाबी. समुद्राच्या त्या पार्श्वभूमीवर मला ती एखाद्या जलपरीसारखी भासत होती. पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावरून ओघळत होते.
"ओळखलंस मला?", नेहा
"व्वा, तुम्हाला कोण नाही ओळखत, खरंतरं माझे नाव तुम्हाला माहीत आहे हे ऐकूनच आश्चर्य वाटले", मी
"ए s s s तुम्ही वगैरे काय?", नेहा
"मग काय, मोठी लोकं तुम्ही", मी स्तुतिसुमन उधळायची काय थांबत नव्हतो. खरं तर ती माझ्याशी बोलतीय यावरच माझा विश्वास बसत नव्हता.
"पुरे पुरे.. तूच ठीक आहे.. बरं, तू एकडे कसा?" नेहा
"आलो असाच फिरत फिरत, मला समुद्राच्या किनाऱ्यावर फिरायला खूप आवडते." मी
"हो sss मला पण.. मी तुझ्याबरोबर इथे जरा वेळ फिरले तर चालेल ना?", नेहा
त्यानंतर जवळ-जवळ एक तास भर आम्ही मस्त मनसोक्त गप्पा मारल्या. अगदी खूप वर्षापासून ओळख असल्यासारखी.
दुसऱ्या दिवशी कॉलेजला जरा खुशीतच गेलो. नेहाशी गप्पा मारून मित्रांवर इंप्रेशन मारता येईल हाच विचार मनात होता. पण आज नेहा वर्गात आलीच नाही, त्यामुळे सगळे तास खूप कंटाळवाणे गेले. बाहेर पडलो. कॅटीनबाहेर नेहाची गाडी दिसली, म्हणून आत डोकावून पाहिले. नेहा-विनीत आणि त्याचा ग्रुप बसला होता. विनीत तिला जोर-जोरात काहीतरी ओरडत होता. शेवटी वैतागून ती बाहेर पडली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. नक्कीच काहीतरी भांडण झाली होती. मी बाहेरच उभा होतो. तिने एकदा माझ्याकडे बघितले आणि गाडी चालू करून निघून गेली.
मी पण माझी गाडी काढली आणि घरी न जाता, गाडी समुद्राकडे वळवली. माझा अंदाज खरा ठरला. दूरवर नेहा गुडघ्यात डोकं खुपसून रडताना दिसली. मला बघताच तिने डोळे पुसले, आणि दुसरीकडे कुठेतरी बघत बसली. बराच वेळ शांततेत गेला, मग तिच म्हणाली, "विनीत खरंच खूप चांगला आहे रे. त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे. पण तो माझ्या बाबतीत खूप पझेसीव्ह आहे. मी दुसऱ्या कुणाशी बोललेले त्याला आवडत नाही.. काल आपण इकडे गप्पा मारल्या ते त्याला कुणीतरी सांगितले, ते त्याला आवडले नाही. प्लीज तू त्याला समजावून सांग ना की आपल्यात तसे काही नाहीये."
एवढे बोलून ति निघून गेली. दुसऱ्या दिवशी मी विनीत आणि नेहाला एकत्रच भेटलो. त्याला खात्री पटवून दिली की तो समजतोय तसे काही नाहीये. त्यालाही ते पटले. मग भरपूर गप्पा मारून, ती दोघ निघून गेली.
त्यानंतर त्या दोघांमधील भांडण वाढतच गेली. कारण एकच, त्याचा पझेसिव्हनेस, कधी तिने केस मोकळे सोडले म्हणून, कधी लिपस्टिक लावले, कधी शॉर्ट स्कर्ट घातला, तरी कधी अजून काही. रोजची भांडण, रोजची रडारड. कधी ती मला भेटून त्याला समजवायला सांगायची, तर कधी तो मला भेटून तिला त्याच्यासाठी मनवायला सांगायचा. एव्हाना मी या वकिलीमध्ये चांगलाच पारंगत झालो होतो. नेहा मला म्हणाली सुद्धा, तू वकील का नाही होत, चांगले बोलता येते तुला.
कित्येक दिवस गेले, भांडण मात्र या ना त्या कारणाने चालूच होती. विनीतचा माझ्यावर थोडाफार विश्वास होता, त्यामुळे तो त्याच्या मित्र-मंडळींसोबत कुठे चालला असेल तर मला नेहा बरोबर थांबायला सांगायचा. मग तो परत येईपर्यंत मी तिच्याबरोबर गप्पा मारत बसायचो. तिचे सरदारजीचे विनोद, कधीतरी एखादी कविता, तिचे गाणे गुणगुणणे, तिच्या मैत्रिणींचे प्रॉब्लेम्स, गॉसिप्स सगळे काही मनापासून ऐकायचो. पहिल्या-पहिल्यांदा विनीतच्या परतण्याची वाट पाहणारी नेहा, नंतर नंतर मात्र त्याच्यापासून दूर जाऊ लागली, त्याला या ना त्या कारणाने टाळू लागली. त्या दोघांमधली दरी वाढतच गेली, आणि आमच्यातले अंतर कमी कमी होत गेले.
एके दिवशी तर कमालच झाली, गावात देवीची जत्रा होती, विनीत तिला त्याच्याबरोबर यायला सांगत होता, पण बरं नाही म्हणून टाळले. इकडे, मी आणि माझे काही मित्र-मैत्रिणी जत्रेला जाणार होतो, तेंव्हा नेहाने चक्क माझ्याबरोबर यायला संमती दाखवली. हे म्हणजे माझ्यासाठी खूपच होते. मी चक्क तिला माझ्या गाडीवर बसवून जत्रेला गेलो. तिकडे आम्ही खूप मजा केली. जत्रेत रंगांची, गुलालाची खूप उधळण झाली. मग आम्ही सगळे अंगाला, कपड्यांना लागलेला रंग धुण्यासाठी समुद्रावर गेलो. तिकडे मस्त पाण्यात खेळलो, मातीत किल्ले केले, खूप धमाल केली. माझ्यासाठी तो दिवस स्वप्नवतच होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी सहजच तिला फोन केला, बोलताना सहजच विचारले, "कालचा रंग गेला का?".
तर म्हणाली, "तो रंग केंव्हाच गेला, पण तुझा रंग उतरतच नाहीये.
मी म्हणले, "म्हणजे काय?"
तर पटकन सारवासारव करून म्हणाली, "अरे म्हणजे तो कुठलातरी रंग तू लावलास ना, तो जातच नाहीये."
त्यानंतर असे बऱ्याचदा होत गेले, ती मला काही सुचवायला तर बघत नव्हती?, असे तर नव्हते की ती आता माझ्यावर प्रेम करू लागली होती? नुसत्या विचारानेच माझ्या अंगावर गोड शहारे उमटले. तिच्या मैत्रिणींचा पण माझ्याशी बोलण्याचा सुर बदलला होता. नेहा कुठे दिसली नाही, की त्या मलाच येऊन विचारायच्या, आणि मग उगाचच हसत निघून जायच्या. विनीत पण मला जाता येता टॉन्ट मारायचा, "गद्दार, बेवफा, दोस्त दोस्त ना रहा" वगैरे म्हणायचा.
दिवसांवर दिवस जात होते. माझी आता खात्रीच झाली होती की नेहाच्या मनात विनीत नसून मीच आहे.
पण एक दिवस माशी शिंकली, जे होऊ नये ते घडले. नेहा आणि विनीतला मी नारळाच्या बागेत हातात हात घेऊन गप्पा मारत बसलेले बघितले. माझ्या मनात रचलेले मनोरे, क्षणात कोसळून गेले. पुढे-पुढे तर काही झालेच नव्हते असे संबंध विनीत नेहा चे जमले. एकत्र फिरणे, सिनेमा वगैरे. आमच्या कॉलेजचे लव्ह-बर्डस…
आज बऱ्या दिवसांनी, पावसाचे परत भरून आले होते. आज परत मी एकटाच होतो. चालता-चालता सहज मागे वळून पाहिले, सगळा समुद्र-किनारा रिकामाच होता. कुणीतरी मागून पळत येऊन मला हाक मारेल ही अपेक्षा व्यर्थ होती. ओल्या मातीमध्ये पावलांच्या खुणा उमटत होत्या, आणि येणारी समुद्राची प्रत्येक लाट, आळीपाळीने एक एक खुणा मिटवत होत्या, जणु काही तो समुद्रच मला मागच्या खुणा विसरून जायला सांगत होता.
दूरवर MTDC मध्ये कुठल्याश्या रिमिक्स गाण्यावर तरूण-तरूणी नाचत होते, त्यातील काही ओळी कानावर पडल्या:
" जिंदगी मे कोई कभी आए ना रब्बा..
आए तो कोई फीर जाए ना रब्बा ssss
देने हो अगर मुझे बाद मै आसू..
पहेले कोई हसाए ना रब्बा s s s.. पहेले कोई हसाए ना रब्बा "

Wednesday, July 14, 2010

'लिमिटेड' वारकरी, 'अनलिमिटेड' शहरी.....

दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पुणेकरांचा निरोप घेत माउलींच्या पालखीने गुरुवारी दुपारी कडक उन्हात दिवे घाटाची अवघड वळणे अगदी सहजपणे पार केली. घाटात चार-पाच किलोमीटर चालल्यानंतर मला घाम फुटला. मात्र साठी ओलांडलेले वारकरीही हरिपाठातील ओव्या म्हणत उत्साहाने घाटातील वाट चढताहेत, हे पाहून मला टीव्हीवर काही वर्षांपूर्वी येणाऱया "साठ साल के बुढे, या साठ साल के जवान' या जाहिरातीची आठवण झाली. महाराष्ट्राच्या "माती'त मोठी झालेली ही माणसं भलतीच दणकट. त्यात लाडक्या विठूरायाच्या भेटीला जाण्याच्या आनंदाने त्यांना कशाचीच तमा नसते. ऊन असू दे, पाऊस पडू दे, त्यांचं वारीतील नित्योपचार परंपरेप्रमाणे आणि वेळेत पार पडतात.

सकाळी हडपसरमध्ये विसाव्याची वेळी वसंत ऊर्फ संतानाना चोपदार यांच्याशी गप्पा झाल्या. सोहळ्यात चोपदारांना खूप महत्त्व. संपूर्ण पालखीचं नियंत्रणच चोपदारांकडं असतं. पालखीसोहळा प्रमुखही चोपदारांशी बोलूनच सर्व काही नियोजन करतात. कालच पुण्यात झालेल्या बैठकीत राज्याचे विधी व न्यायमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वारकरी कोण, असा एक नवाच आणि वादग्रस्त प्रश्न उपस्थित केला होता. साहजिकच संतानानांशी बोलताना तो विषय आलाच. त्यावर संतानानांच उत्तर अगदी समर्पक होतं. भिकारी होऊन वारीची वाट चालतो तो वारकरी. नुसती माळ घातली की सगळी कर्म होत नाहीत. त्यागाची संकल्पनाही तितकीच महत्त्वाची आहे. वारकऱयांना कशाचीच अपेक्षा नको. वारी करायची, एकादशीला चंद्रभागेत स्नान करायचे, नामदेव पायरीचे दर्शन घ्यायचे आणि मंदिर प्रदक्षिणा करून आपापल्या गावी परतायचे.

संतानाना जे बोलले ते पटण्यासारखंच आहे. वारीत चालणारे वारकरी बघितले, की ते जाणवतंही. खरंच त्यांना कोणती समिती, त्यावरचे प्रतिनिधी, त्यामागचं राजकारण या कशाचीच काही घेणंदेणं नाही. वारीचे दिवस जवळ आले, की शेतातली काम आटपायची. मोजक्या सामानाबरोबर आळंदी गाठायची. घरदार, मुलगा-मुलगी, सून नातवंड सगळ्यांना विसरून पंधरा-वीस दिवस ज्ञानोबा-तुकोबांच्या नामस्मरणात, विठूरायाला भेटण्याच्या आनंदात घालवायची. जे मिळेल ते खायचं, पाऊस पाण्यात मिळेल तेवढ्या जागेत घटकाभर विश्रांती घ्यायची. काही झाले तरी चालेल, वारीतील नित्योपचार चुकवायचे नाहीत. कोणालाही आदर्श वाटेल, अशीच ही जीवनपद्धती.

वारीला जायचं म्हणून काल घरी बॅग भरली, त्यावेळी एक मोठी बॅगपॅक, लॅपटॉप बॅग एवढं सगळं भरल्यानंतरही मला पुढच्या १५ दिवसांसाठी एवढ्या सामानावर आपलं भागेल का, असा प्रश्न पडला होता. वारकरी एका शबनममध्ये बसेल, एवढंच सामान घेऊन येतात. त्यावरच ते १५ दिवस काढतात. त्यांच्या गरजाच अतिशय लिमिटेड. आपण मात्र अनलिमिटेडच्या जमान्यात वाढतोय. मोबाईलच्या प्लॅनपासून ते आयुष्याच्या विम्यापर्यंत आपल्याला सगळंच अनलिमिटेड हवंय. काय योग्य आणि काय अयोग्य मला खरंच ठरवता येत नाहीये. प्रत्येक दिवशी वारकऱयांकडून मला नवीन शिकायला मिळतंय, एवढं खरं
शेवटी एकच...
इतुले करी भलत्यापरी,
परद्रव्य परनारी,
सोडूनिया अभिलाषा अंतरी,
वर ते व्यवहारी सुखरूप.

जनसेवा हीच ईश्वर सेवा......

सकाळी निघायला थोडा उशीरच झाला होता. पालखी पुढं जाऊन अर्धा-पाऊण तास होऊन गेला होता. मग गाडीतून थोडं अंतर पुढं जाऊन फलटणजवळच्या विडणी गावातून चालायला सुरवात केली. उन्हाचा चांगलाच चटका बसत होता. घामाच्या धाराही वाहात होत्या. सात आठ किलोमीटर चालून पिंपरदमध्ये दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी पोचलो. संस्थानच्या तंबूत सोहळाप्रमुख डॉ. शिवाजीराव मोहिते आणि साताऱयाचे पोलिस उपाधीक्षक वसंत जाधव यांच्याबरोबर बोलत होतो. तंबूत पत्रकारांची फारशी गर्दी नव्हती. त्यावेळी एक ४०-४५ वर्षांची महिला तंबूजवळ आली. ती थोडीशी गोंधळल्यासारखी वाटत होती. काही वेळानं त्या माउलीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. काय झाल म्हणून विचारल्यावर तिनं दिंडीतून चुकल्याचं सांगितलं.  आम्ही लगेचच कोणत्या दिंडीतून चालताय, याची चौकशी केली. त्यावर तिनं रथामागं ४ क्रमांकाच्या दिंडीत असल्याचं सांगितल. पिंपरदकडे येताना वाटेत टॅंकरमधून पाण्याची बाटली भरताना वेळ गेला आणि त्यात तिच्या दिंडीतील महिला वारकरी पुढे निघून गेल्या. त्या माउलीला काही सुचत नव्हते. तिच्या दिंडीतील वारकरी दुपारच्या विसाव्यासाठी कुठं थांबतात, हे मलाही माहिती नव्हतं.

सुरवातीला तिला धीर देण्याचं काम आम्ही केलं. कोणती दिंडी दुपारी विसाव्यासाठी कुठं थांबते, हे शोधणं फार जिकिरीचं काम. चोपदारांनाही याची फारशी माहिती नसते. प्रत्येक दिंडीचा रात्रीच्या मुक्कामाची ठिकाणं ठरलेली असतात. त्याची माहिती चोपदारांकडे असते. मात्र, दुपारचा विसावा दोन-अडीच तासांचा असतो. त्यामुळं दिंड्या सोयीप्रमाणं वेगवेगळ्या ठिकाणी थांबतात. त्या माउलीला तिच्या दिंडीपर्यंत कसं पोचवायचं, असा प्रश्न पडला होता. चार नंबरची दिंडी शोधण्यासाठी खूप धावपळ केली. पण त्यातून फार काही हाती पडलं नाही. शेवटी मी शोधा-शोध थांबवली. दुपारचा एक वाजून गेला होता. त्यामुळं दुसऱया एका दिंडीत त्या माउलीच्या जेवणाची व्यवस्था करून दिली. जेवण झाल्यानंतर त्या माउलीला रथाजवळ उभं राहण्यास सांगितलं. कोणत्याही चुकलेल्या वारकऱयाला चालतानाच दिंडी सापडते, असा आतापर्यंतचा अनुभव. लिहिता, वाचता येत नसल्यानं आम्ही त्या माउलीला एक उपाय सांगितला. विसाव्याच्या ठिकाणाहून रथ पुढे गेल्यावर तीन पताका सोडून चोथ्या पताका गेल्यावर त्या दिंडीत चालण्याची सूचना केली. तिलाही ते बरोब्बर कळलं. सहज म्हणून त्या माउलीला नाव-गाव विचारलं, मुद्रिकाबाई ठवरे असं तिचं नाव. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आनंदवाडी येथून ती आली होती.

पालखी सोहळ्यात रोज असे अनेक वारकरी दिंडीतून चुकतात. एकदा दिंडीतून चुकलं, की विसाव्याचं ठिकाण शोधणं किंवा मुक्कामाच्या ठिकाणी जाणं खूप जिकिरीचं होऊन बसतं. अनेक वारकऱयांना दिंडीचा तळ शोधता न आल्यानं कधीकधी जागा मिळेल तिथं विश्रांती घ्यावी लागते. जवळ फारसे पैसे नसतात. मोबाईल वगैरे लांबची गोष्ट. गावाकडून आल्यामुळं काही महिलांना तर पुरुषांशी कसं बोलायचं, याचाही प्रश्न पडतो. जग खूप हायटेक झालंय. सातासमुद्रापार असलेले मित्रही सोशल नेटवर्किंगमुळे रोजच्या रोज संपर्कात असतात. इथं मात्र काहीच अंतरावर असलेल्या वारकऱयांशी संपर्क साधणंही खूप अवघड होऊन बसतं. २०-२५ हजार लोकवस्ती असलेल्या गावात एकाचवेळी दोन-अडीच लाख लोक आल्यानं मोबाईलचं नेटवर्कही जाम होऊन जातं. त्यामुळं मोबाईल असूनही कधीकधी काहीच करता येत नाही. मुद्रिकाबाईना त्यांची दिंडी आतापर्यंत सापडली असेल. वारीत चुकणाऱयांची संख्या खूप असली, तरी एक गोष्ट निश्चितच चांगलीये की चुकलेल्यांना मार्ग दाखविणारे हातही लाखो आहेत. चुकलेल्यांना मदत करण्यासाठी कोणी ना कोणी तरी पुढे येतेच आणि मग वारीचा मार्ग सुकर होऊन जातो.

Sunday, February 14, 2010

सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका

लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात

फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ

गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-

एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.न

राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, ;समुद्रकिनारी

इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू

शकणार आहेस??... मुठभर मासे वाचवून जगाला

असा काय फ़रक पडणार आहे?त्या मुलाने आणखी

एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं,

यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण

या माशाला विचारा, त्याला काय फ़रक पडला? ज्याचा

मी नुकताच जीव वाचवला

Thursday, February 11, 2010

माझा आवडता पक्षी

माझा आवडता पक्षी कोंबडी

*निबंध :- माझा आवडता पक्षी कोंबडी*

http://sl.glitter-graphics.net/pub/1029/1029616db977tf2hv.gif
मला सगळेच प्राणी आवडतातप्राणी खुप चविष्ट लागतात.
http://sl.glitter-graphics.net/pub/297/297011vvrmbeqojk.gif
कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझ आवडता पक्षी आहे.
http://sl.glitter-graphics.net/pub/297/297011vvrmbeqojk.gif
कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतातमला बनवता येत नाहीत पण खाता येतात.
http://sl.glitter-graphics.net/pub/297/297011vvrmbeqojk.gif
कोंबडी शाकाहारी असतेत्यामुळे मला तिचा आदर वाटतोगांधीजी सुध्धा शाकाहारी होतेम्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो.
http://sl.glitter-graphics.net/pub/297/297011vvrmbeqojk.gif
कोंबडीला ताप येतोताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितातपण ताप आलेली कोंबडीचांगली उकळवून  घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा तापकायमचा जाऊ शकतोयाच तापाला "बर्ड फ्युका असेच काहीतरी नाव इंग्रजी नाव आहे.
http://sl.glitter-graphics.net/pub/297/297011vvrmbeqojk.gif
मला गणित  इंग्रजी येत नसल्याने मला शाळेत खुप ताप होतो.
http://sl.glitter-graphics.net/pub/297/297011vvrmbeqojk.gif
कोंबडीला दगड मारल्यावर ती पकाक असा आवाज काढतेमला तो खूप आवडतोनानापाटेकरचा पक पक पकाक असा सिनेमा आहेभरत जाधवचा पण जत्रा नावाचा कोंबडीवरसिनेमा आहेतो मात्र अतिशय वाईट होतासिनेमा बघणे वाईट असते असे मो¤  माणसेसांगतात पण मला सिनेमा पाहणे आवडते.
http://sl.glitter-graphics.net/pub/297/297011vvrmbeqojk.gif
पुर्वीचे लोक कोंबड्या चोरत त्यांना कोंबडीचोर म्हनतचोरी करणे चूक आहेचोरी केल्यावरआजकाल जेलमध्ये टाकतात



बाप

बाळंतपण झाल्यावर ,धावपळ करतो

औषध घेतो ,चहा,कॉफ्फी आणतो

पैश्याची जुळवाजुळव करतो

..........तो बाप असतो

सगळ्यांना ने आण करतो

स्वयंपाक हि करतो

सिजरीन नंतर बायकोला त्रास नको ,

म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो

............ ..तो बाप असतो

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो

donation साठी उधार आणतो,

वेळ पडली तर हातापाया पडतो

............तो बाप असतो

कॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो

स्वतः फाट्क बनियन घालून

तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो

............ ..तो बाप असतो

स्वतः टपरा mobile वापरून,तुम्हाला stylish mobile घेऊन देतो

तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो

तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो

............ ...तो बाप असतो

lovemarriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो

"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो

"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस ऐकल्यावर खूप रडतो

............ ....तो बाप असतो

जाताना पोरगी सासरी,धायमोकळून रडतो

माझ्या चिऊला नीट ठेवा

असे हात जोडून सांगतो

............ .........तो बाप असतो