पालखी सोहळ्यात रोज असे अनेक वारकरी दिंडीतून चुकतात. एकदा दिंडीतून चुकलं, की विसाव्याचं ठिकाण शोधणं किंवा मुक्कामाच्या ठिकाणी जाणं खूप जिकिरीचं होऊन बसतं. अनेक वारकऱयांना दिंडीचा तळ शोधता न आल्यानं कधीकधी जागा मिळेल तिथं विश्रांती घ्यावी लागते. जवळ फारसे पैसे नसतात. मोबाईल वगैरे लांबची गोष्ट. गावाकडून आल्यामुळं काही महिलांना तर पुरुषांशी कसं बोलायचं, याचाही प्रश्न पडतो. जग खूप हायटेक झालंय. सातासमुद्रापार असलेले मित्रही सोशल नेटवर्किंगमुळे रोजच्या रोज संपर्कात असतात. इथं मात्र काहीच अंतरावर असलेल्या वारकऱयांशी संपर्क साधणंही खूप अवघड होऊन बसतं. २०-२५ हजार लोकवस्ती असलेल्या गावात एकाचवेळी दोन-अडीच लाख लोक आल्यानं मोबाईलचं नेटवर्कही जाम होऊन जातं. त्यामुळं मोबाईल असूनही कधीकधी काहीच करता येत नाही. मुद्रिकाबाईना त्यांची दिंडी आतापर्यंत सापडली असेल. वारीत चुकणाऱयांची संख्या खूप असली, तरी एक गोष्ट निश्चितच चांगलीये की चुकलेल्यांना मार्ग दाखविणारे हातही लाखो आहेत. चुकलेल्यांना मदत करण्यासाठी कोणी ना कोणी तरी पुढे येतेच आणि मग वारीचा मार्ग सुकर होऊन जातो.
Wednesday, July 14, 2010
जनसेवा हीच ईश्वर सेवा......
सकाळी निघायला थोडा उशीरच झाला होता. पालखी पुढं जाऊन अर्धा-पाऊण तास होऊन गेला होता. मग गाडीतून थोडं अंतर पुढं जाऊन फलटणजवळच्या विडणी गावातून चालायला सुरवात केली. उन्हाचा चांगलाच चटका बसत होता. घामाच्या धाराही वाहात होत्या. सात आठ किलोमीटर चालून पिंपरदमध्ये दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी पोचलो. संस्थानच्या तंबूत सोहळाप्रमुख डॉ. शिवाजीराव मोहिते आणि साताऱयाचे पोलिस उपाधीक्षक वसंत जाधव यांच्याबरोबर बोलत होतो. तंबूत पत्रकारांची फारशी गर्दी नव्हती. त्यावेळी एक ४०-४५ वर्षांची महिला तंबूजवळ आली. ती थोडीशी गोंधळल्यासारखी वाटत होती. काही वेळानं त्या माउलीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. काय झाल म्हणून विचारल्यावर तिनं दिंडीतून चुकल्याचं सांगितलं. आम्ही लगेचच कोणत्या दिंडीतून चालताय, याची चौकशी केली. त्यावर तिनं रथामागं ४ क्रमांकाच्या दिंडीत असल्याचं सांगितल. पिंपरदकडे येताना वाटेत टॅंकरमधून पाण्याची बाटली भरताना वेळ गेला आणि त्यात तिच्या दिंडीतील महिला वारकरी पुढे निघून गेल्या. त्या माउलीला काही सुचत नव्हते. तिच्या दिंडीतील वारकरी दुपारच्या विसाव्यासाठी कुठं थांबतात, हे मलाही माहिती नव्हतं.
सुरवातीला तिला धीर देण्याचं काम आम्ही केलं. कोणती दिंडी दुपारी विसाव्यासाठी कुठं थांबते, हे शोधणं फार जिकिरीचं काम. चोपदारांनाही याची फारशी माहिती नसते. प्रत्येक दिंडीचा रात्रीच्या मुक्कामाची ठिकाणं ठरलेली असतात. त्याची माहिती चोपदारांकडे असते. मात्र, दुपारचा विसावा दोन-अडीच तासांचा असतो. त्यामुळं दिंड्या सोयीप्रमाणं वेगवेगळ्या ठिकाणी थांबतात. त्या माउलीला तिच्या दिंडीपर्यंत कसं पोचवायचं, असा प्रश्न पडला होता. चार नंबरची दिंडी शोधण्यासाठी खूप धावपळ केली. पण त्यातून फार काही हाती पडलं नाही. शेवटी मी शोधा-शोध थांबवली. दुपारचा एक वाजून गेला होता. त्यामुळं दुसऱया एका दिंडीत त्या माउलीच्या जेवणाची व्यवस्था करून दिली. जेवण झाल्यानंतर त्या माउलीला रथाजवळ उभं राहण्यास सांगितलं. कोणत्याही चुकलेल्या वारकऱयाला चालतानाच दिंडी सापडते, असा आतापर्यंतचा अनुभव. लिहिता, वाचता येत नसल्यानं आम्ही त्या माउलीला एक उपाय सांगितला. विसाव्याच्या ठिकाणाहून रथ पुढे गेल्यावर तीन पताका सोडून चोथ्या पताका गेल्यावर त्या दिंडीत चालण्याची सूचना केली. तिलाही ते बरोब्बर कळलं. सहज म्हणून त्या माउलीला नाव-गाव विचारलं, मुद्रिकाबाई ठवरे असं तिचं नाव. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आनंदवाडी येथून ती आली होती.
पालखी सोहळ्यात रोज असे अनेक वारकरी दिंडीतून चुकतात. एकदा दिंडीतून चुकलं, की विसाव्याचं ठिकाण शोधणं किंवा मुक्कामाच्या ठिकाणी जाणं खूप जिकिरीचं होऊन बसतं. अनेक वारकऱयांना दिंडीचा तळ शोधता न आल्यानं कधीकधी जागा मिळेल तिथं विश्रांती घ्यावी लागते. जवळ फारसे पैसे नसतात. मोबाईल वगैरे लांबची गोष्ट. गावाकडून आल्यामुळं काही महिलांना तर पुरुषांशी कसं बोलायचं, याचाही प्रश्न पडतो. जग खूप हायटेक झालंय. सातासमुद्रापार असलेले मित्रही सोशल नेटवर्किंगमुळे रोजच्या रोज संपर्कात असतात. इथं मात्र काहीच अंतरावर असलेल्या वारकऱयांशी संपर्क साधणंही खूप अवघड होऊन बसतं. २०-२५ हजार लोकवस्ती असलेल्या गावात एकाचवेळी दोन-अडीच लाख लोक आल्यानं मोबाईलचं नेटवर्कही जाम होऊन जातं. त्यामुळं मोबाईल असूनही कधीकधी काहीच करता येत नाही. मुद्रिकाबाईना त्यांची दिंडी आतापर्यंत सापडली असेल. वारीत चुकणाऱयांची संख्या खूप असली, तरी एक गोष्ट निश्चितच चांगलीये की चुकलेल्यांना मार्ग दाखविणारे हातही लाखो आहेत. चुकलेल्यांना मदत करण्यासाठी कोणी ना कोणी तरी पुढे येतेच आणि मग वारीचा मार्ग सुकर होऊन जातो.
पालखी सोहळ्यात रोज असे अनेक वारकरी दिंडीतून चुकतात. एकदा दिंडीतून चुकलं, की विसाव्याचं ठिकाण शोधणं किंवा मुक्कामाच्या ठिकाणी जाणं खूप जिकिरीचं होऊन बसतं. अनेक वारकऱयांना दिंडीचा तळ शोधता न आल्यानं कधीकधी जागा मिळेल तिथं विश्रांती घ्यावी लागते. जवळ फारसे पैसे नसतात. मोबाईल वगैरे लांबची गोष्ट. गावाकडून आल्यामुळं काही महिलांना तर पुरुषांशी कसं बोलायचं, याचाही प्रश्न पडतो. जग खूप हायटेक झालंय. सातासमुद्रापार असलेले मित्रही सोशल नेटवर्किंगमुळे रोजच्या रोज संपर्कात असतात. इथं मात्र काहीच अंतरावर असलेल्या वारकऱयांशी संपर्क साधणंही खूप अवघड होऊन बसतं. २०-२५ हजार लोकवस्ती असलेल्या गावात एकाचवेळी दोन-अडीच लाख लोक आल्यानं मोबाईलचं नेटवर्कही जाम होऊन जातं. त्यामुळं मोबाईल असूनही कधीकधी काहीच करता येत नाही. मुद्रिकाबाईना त्यांची दिंडी आतापर्यंत सापडली असेल. वारीत चुकणाऱयांची संख्या खूप असली, तरी एक गोष्ट निश्चितच चांगलीये की चुकलेल्यांना मार्ग दाखविणारे हातही लाखो आहेत. चुकलेल्यांना मदत करण्यासाठी कोणी ना कोणी तरी पुढे येतेच आणि मग वारीचा मार्ग सुकर होऊन जातो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment